Raj Thackeray In Pune | मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी राज ठाकरे पुण्यात, ‘या’ दिवशी घेणार जाहीर सभा

Raj Thackeray In Pune :- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आता महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारांचा धडाका सुरू केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी राज ठाकरे यांना विनंती केल्यानंतर त्यांची कणकवली येथे जाहीर सभा पार पडली. त्यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करत राणेंना निवडून आणण्याचं जाहीर आव्हान देखील केलं होतं. अशातच आता राज ठाकरे यांची पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यासाठी जाहीर सभा होत आहे.

पुण्यात महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नेते आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. यातच राज ठाकरेंची साथ सोडत वंचितकडून वसंत मोरे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे. अशातच मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी राज ठाकरे यांची येत्या दहा तारखेला पुण्यातील नदीपात्रात सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Baramati Loksabha | पाणी प्रश्नावरून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चांगलीच खडाजंगी

Chandrakant Patil | पराभव समोर दिसत असल्याने संविधान बदलण्याची भाषा! चंद्रकांत पाटील यांचा कॉंग्रेसवर जोरदार प्रहार

Muralidhar Mohol | सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी मेट्रोचा विस्तार करणार

You May Also Like