Baramati Loksabha | पाणी प्रश्नावरून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चांगलीच खडाजंगी

Baramati Loksabha | गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या बारामती मतदारसंघात (Baramati Loksabha ) आज प्रचाराच्या तोफा थंडवणार आहे. यातच आता महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी मतदारसंघात सांगता सभा होत आहेत. अशातच पाणी प्रश्नावरून अजित पवार (Ajit Pawar) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यात चांगलीच खडाजंगी बघायला मिळाली.

पाणीप्रश्नावरून सत्ताधारी राजकारण करत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला होता. त्यावर अजित पवार म्हणाले की, कोण मायचा लाल दौंड, बारामती, इंदापुरचं पाणी आडवतो ते मी पाहतो. असं काल कोणी तरी बोललं. अंग पण तिथं पाणीच नाही, तर काय पाहते ? अरे यांना काही माहिती नाही. आम्ही सगळं कामं करायचो. या राहुल कुल यांना विचारा, किती टीएमसीची धरणं आहेत, किती पाणी पुण्याला प्यायला जातं, किती पाणी शिल्लक राहतं ? पाणीच शिल्लक नाही तर कोण अडवणार ? अगं बाई आम्ही तुला निवडून द्यायचो, उगीच मला बोलायला लावू नका. असा इशाराही अजित पवारांनी दिला.

पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, मी तर ठरवलं आहे या भावकीवर बोलायचंंच नाही. त्यांचं त्यांना लखलाभ. असं काही बोललं तर थोडा वेळ लोकांना बरं वाटेल, पण त्यातून लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत. तुमच्या शेतामध्ये पाणी आणण्यासाठी राज्याचा पैसा आणला पाहिजे. केंद्राचा पैसा आणला पाहिजे. बुडीत बंधारे बांधले पाहिजेत. पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायला पाहिजे. असेही अजित पवारांनी म्हटलं.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Murlidhar Mohol | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी

Chitra Wagh | मोठ्या ताईंचा एकेक व्हिडिओ पाहून हसू येतं, त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय