Ramesh Chennithala | राज्यातील महायुतीचे भ्रष्ट सरकार हटवून महाविकास आघाडीचे सरकार आणा

Ramesh Chennithala | काँग्रेस पक्ष हा सर्व समाजांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. आगामी निवडणुकीत सर्व समाज घटकाला प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी प्रयत्न केला जाईल. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीला चांगला विजय मिळाला आहे, आता विधानसभा निवडणुकीतही जिल्हा, तालुका, बुथ स्तरावर असेच काम करा आणि राज्यातील महायुतीचे भ्रष्ट सरकार हटवून महाविकास आघाडीचे सरकार आणा, असे आवाहन प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात मोठा विजय मिळवल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सेल व विभागाच्या वतीने प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सत्कार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सेल व विभागाकडून दादरच्या शिवाजी मंदिर येथे करण्यात आला, यावेळी चेन्नीथला बोलत होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like