Devendra Fadnavis | मला सरकारमधून मोकळं करावं, लोकसभेच्या पराभवानंतर देवेंद्र फडणवीसांची नेतृत्त्वाला विनंती

Devendra Fadnavis | लोकसभा निवडणुकीनंतर एनडीए सरकार देशात पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार असले तरीही भाजपाच्या जागा कमी झाल्या आहेत. महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सपाटून मार खाल्ला असून त्यांना केवळ १७ जागा जिंकता आल्या आहेत. त्यातही भाजपाला केवळ ७ जागा मिळाल्या असून २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाने १५ जागा गमावल्या आहेत. हा पराभव भाजपाचे नेते व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे मला सरकारमधून मोकळं करावे अशी विनंती मी नेतृत्त्वाकडे करणार आहे, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर मुंबईत पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. किंबहुना आमच्या आपेक्षापेक्षा खूप कमी जागा मिळाल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घातलं. जो पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस स्वीकारत आहे. आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे. मला सरकारमधून मोकळ करावं, अशी मी विंनती करणार आहे. बाहेर राहिलो तरी मी काम करीन. पण मला आता पूर्णवेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रीत करायचं आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like