Rohit Sharma | रोहित शर्मा टी20 क्रिकेटमधून निवृत्त, मग आयपीएल खेळणार की नाही? हिटमॅन म्हणाला…

Rohit Sharma  | भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला हरवून आयसीसी टी20 विश्वचषक जिंकला आहे. यानंतर संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

तो म्हणाला की, मी टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा कधीच विचार केला नव्हता. विश्वचषक ट्रॉफीसह निवृत्त होण्यापेक्षा चांगले काय असू शकते? रोहितने टी20 इंटरनॅशनलमधून निवृत्ती घेण्याचा कधीच विचार केला नव्हता, पण विराट कोहलीप्रमाणे त्याला युवा खेळाडूंसाठी मार्ग काढायचा होता, त्यामुळेच त्याने हा निर्णय घेतला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सात धावांनी रोमांचक विजय मिळवल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित म्हणाला की, टी20 ला निरोप देण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही.असे असले तरीही, रोहित आयपीएल खेळत राहणार आहे.

37 वर्षीय रोहित म्हणाला (Rohit Sharma ) की, मी माझ्या भविष्याबाबत असे निर्णय घेत नाही. मला जे योग्य वाटतं ते मी आतून करण्याचा प्रयत्न करतो. मी भविष्याचा फारसा विचार करत नाही किंवा मागच्या वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर मी हा विश्वचषक खेळणार की नाही याचा विचारही केला नाही.

सात महिन्यांपूर्वी भारताने घरच्या मैदानावर एकदिवसीय विश्वचषक जिंकला असता तर तो टी-20पूर्वी निवृत्त झाला असता का, या प्रश्नाच्या उत्तरात रोहित म्हणाला की, मी टी-20मधून निवृत्ती घेईन, असे कधीच वाटले नव्हते माझ्यासाठी हीच योग्य वेळ आहे असे मला वाटले. विश्वचषक जिंकल्यानंतर निवृत्त होण्यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. रोहित तात्विक स्वरात म्हणाला की जे काही लिहिले जाते ते घडते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like