Chhagan Bhujbal | येवला शहरात पुरपरिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या; छगन भुजबळ यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Chhagan Bhujbal | येवला शहरातील नालेसफाईसह पावसाळी पूर्व कामे तातडीने पूर्ण करण्यात येऊन येवला शहरात पूर परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी येवला नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला शहरातील सुरू असलेल्या नालेसफाईसह पावसाळी पूर्व कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, मोहन शेलार, मकरंद सोनवणे, भाऊसाहेब धनवटे, संतोष खैरनार, सचिन सोनवणे, भूषण लाघवे, सुमित थोरात यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

येवला शहरात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पावसाळी पूर्व कामे पूर्ण करण्याचे सूचना केलेल्या होत्या. त्यानुसार आज मंत्री छगन भुजबळ यांनी सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नालेसफाईसह सुरू असलेल्या कामांची पाहणी करून सबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like