Sharad Pawar | शरद पवारांचं राहुल गांधी यांना वारीत सहभागी होण्याचं निमंत्रण

Sharad Pawar | लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी हिंदूबद्दल केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधींना वारीचे निमंत्रण दिले असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती माढाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची आज (दि. 2) दिल्लीत भेट झाली. शरद पवार यांनी राहुल गांधी यांना आषाढी वारीचे महत्त्व सांगितले. शिवाय वारीत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले असल्याची माहिती समोर आली आहे. तर नियोजन करून पंढरपूरच्या वारीला येण्याबाबत लवकरच कळवतो, असं राहुल गांधी यांच्याकडून देण्यात आलं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like