Sharad Pawar Party | राज्याच्या आर्थिक धोरणासंदर्भात श्वेतपत्रिका काढा, शरद पवार पक्षाची अर्थमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

Sharad Pawar Party | राज्य सरकारच्या वतीने शुक्रवारी अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला होता. यानंतर आता महाराष्ट्राच्या आर्थिक धोरणासंदर्भात श्वेतपत्रिका (White Paper) जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharad Pawar Party) मुख्य प्रवक्ते महेश तपास यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना पत्राद्वारे केली आहे.

महेश तपासे म्हणाले की, राज्य सरकारच्या वतीने शुक्रवारी अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. शिंदे सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला. अर्थमंत्री यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या. मात्र या घोषणा कशा प्रकारे पूर्ण करणाऱ्या संदर्भात कुठलीही ठोस माहिती देण्यात आली नाही आहे. असे तपासे म्हणाले.

पुढे महेश तपासे म्हणाले की, अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पा मध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा दरडोई उत्पन्न मागील वर्षी देशाच्या पाचव्या स्थानी होतं ते आता सहाव्या स्थानी आलं आहे. विशेष म्हणजे यामध्ये आपल्याला गुजरातने मागे टाकले आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या डोक्यावर असलेले कर्ज कशाप्रकारे कमी होणाऱ्या संदर्भात कुठलेही ठोस माहिती अर्थमंत्री यांनी दिलेली नाही आहे. महाराष्ट्राचा जीडीपी वाढवण्यासंदर्भात अर्थमंत्र्यांकडे कुठली ठोस उपायोजना आहे या संदर्भात कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही आहे. असेही महेश तपासे यांनी म्हटले आहे.

महेश तपासे म्हणाले की, राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या योजना संदर्भात राज्य सरकार पैसा कुठून आणणार आहे. यासंदर्भातील माहिती महाराष्ट्रातील जनतेला मिळाली पाहिजे. या संदर्भात राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढायला पाहिजेत. यामध्ये कर्ज, व्याज आणि मुद्दल कशा प्रकारे चुकवली जाते आहे. तसेच १ ट्रिलियनचे अर्थव्यवस्था महाराष्ट्राची करण्यासंदर्भात सरकारकडे कोणते ठोस उपाययोजना आहे. हे या श्वेतपत्रिकामधून महाराष्ट्रातील जनतेला कळल पाहिजे. त्यामुळे अर्थमंत्री अजित पवार यांनी श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी पत्राद्वारे महेश तपासे यांनी केली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like