Shiv Thackeray | शिव ठाकरे 5 वर्षांनी मोठी असलेल्या डेझी शाहसोबत करणार लग्न? अखेर अभिनेत्रीनं सोडलं मौन

शिव ठाकरे (Shiv Thackeray) हे आज छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध नाव बनले आहे. तो बिग बॉस 16 मध्ये दिसला आणि सलमान खानच्या या रिॲलिटी शोने त्याला चांगली ओळख दिली. यानंतर तो रोहित शेट्टीच्या शो ‘खतरों के खिलाडी सीजन 13’ मध्ये धोक्यांसोबत खेळताना दिसला. या शोमध्ये त्याची ओळख वयाने 5 वर्षांनी मोठी असलेल्या अभिनेत्री डेजी शाहसोबत (Daisy Shah) झाली होती.

शोदरम्यान दोघांची चांगली मैत्री झाली. त्यांचा हा बॉन्ड पाहून अनेकांनी दोघं एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज लावला. मात्र, अभिनेत्रीने या विषयावर अनेकदा आपले मत व्यक्त केले आहे. आता पुन्हा एकदा तिने याबाबत मौन सोडले आहे.

शिव आणि मी चांगले मित्र आहोत
अलीकडेच ई-टाइम्सशी बोलताना 39 वर्षीय अभिनेत्री म्हणाली की, लग्नापर्यंत अफवा पोहोचण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशा बातम्या आल्या आहेत. शिव आणि माझ्यात काहीही नाही. आम्ही खूप चांगले मित्र आहोत. अफवा उडत आहेत कारण एक काळ असा होता जेव्हा मी या इंडस्ट्रीत आले होते, माझ्यासाठी सर्व काही अगदी नवीन होते आणि कोणीतरी माझा हात धरून मला मार्गदर्शन केले.

शिव-डेझी एकमेकांना सल्ले देतात
पुढे बोलताना अभिनेत्री म्हणाली की, जेव्हा मी शिवला (Shiv Thackeray) भेटले तेव्हा त्याने मला रिॲलिटी शोबद्दल सांगितले. चित्रपटांचा विचार केला तर त्यांना थोडे मार्गदर्शन हवे असते. अशा परिस्थितीत आम्ही एकमेकांना सल्ला देतो. त्याला माझ्यापेक्षा रिॲलिटी शोमध्ये जास्त अनुभव आहे आणि मला चित्रपटांचा जास्त अनुभव आहे. आमचे नाते खास आहे कारण आम्ही एकमेकांशी खूप बोलतो. जेव्हा तुम्ही एकमेकांसोबत अधिक गोष्टी शेअर करता तेव्हा लोक त्याचा अर्थ तुम्ही रिलेशनशिप मध्ये असल्यासारखे करू लागतात.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like