Rohit Sharma | ‘सिक्सर किंग’ रोहित शर्मा, उपांत्य फेरीत केला विश्वविक्रम, ख्रिस गेलच्या खास क्लबमध्ये मिळाली जागा

भारतीय संघाचा कर्णधार आणि अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) 2024 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. सुपर 8 मध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर रोहितने इंग्लंडलाही सोडले नाही. ज्या खेळपट्टीवर दोन्ही संघांचे फलंदाज झगडत होते. हिटमॅन त्या खेळपट्टीवर जोरदार धावा करत होता. त्याने इंग्लिश गोलंदाजांचा घाम काढला होता. यासह रोहित शर्माने (Rohit Sharma) इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतही विशेष कामगिरी केली आहे. आता या खास यादीत टी-20 क्रिकेटचा बादशाह ख्रिस गेलसोबत त्याचे नावही जोडले गेले आहे. आतापर्यंत हा पराक्रम फक्त ख्रिस गेलच करू शकला आहे. मात्र, अशी कामगिरी करणारा रोहित आता दुसरा फलंदाज ठरला आहे.

टी20 विश्वचषकात 50 षटकार मारणारा रोहित दुसरा फलंदाज
आजपर्यंत टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात केवळ वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलने 50 हून अधिक षटकार ठोकले होते. या स्पर्धेत त्याच्या नावावर 63 षटकार आहेत. मात्र, आता रोहित शर्मा टी-20 वर्ल्ड कपमध्ये 50 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या 57 धावांच्या खेळीत ही कामगिरी केली. रोहितने या सामन्यात 6 चौकार आणि 2 षटकार मारले. यासह त्याने हे विशेष यशही मिळवले.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम सामना होणार आहे
टी20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 29 जून रोजी बार्बाडोस येथे होणार आहे. जिथे भारताला 11 वर्षांपासून आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयश आले आहे. तर दक्षिण आफ्रिकेने आजपर्यंत एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. अशा स्थितीत दोन्ही संघ हा विजेतेपदाचा सामना जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावतील.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like