T20 World Cup 2024 | भारत सेटींग लावून T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये, इंझमामचा गंभीर आरोप

टी२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत (T20 World Cup 2024), उद्या गायना मध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेशी अंतिम सामना होणार आहे. काल भारताच्या फिरकी गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या आणि कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडला माघारी पाठवत भारतीय संघानं तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात धडक मारली आहे.

पावसामुळं नाणेफेकीला उशीर झाल्यानंतर इंग्लंडनं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पहिले दोन गडी झटपट गमावल्यानंतर, पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र रोहित शर्माच्या ५७ आणि सूर्यकुमार यादवच्या ४७ धावांच्या जोरावर भारतीय संघाने१७१ धावांपर्यंत मजल मारली. गोलंदाजांनी उर्वरीत कामगिरी पार पाडत इंग्लंडला सोळा षटक ४ चेंडूत १०३ धावातच गारद केलं.

एकीकडे भारतीय संघ (T20 World Cup 2024) फायनलमध्ये प्रवेश करत असतानाच दुसरीकडे भारतीय संघ सेटींग लावून फायनलमध्ये पोहचल्याचा सूर पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने लावला आहे. भारतीय संघावर तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर इंझमामने पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या टाइम टेबलवरुन इंझमामने टीका केली आहे. भारतीय संघ बॉल टॅम्परिंग करतो असे बिनबुडाचे आरोप केल्यानंतर आता इंझमामने वर्ल्ड कपच्या वेळापत्रकावरुन टीका करताना भारतीय संघ कुठे सेमी-फायनल खेळणार हे स्पर्धा सुरु व्हायच्या आधीच ठरवलं होतं असा दावा इंझमामने केला आहे.

इंझमामने हा अन्याय असल्याचं म्हटलं आहे. तसेच पाकिस्तानला असा फायदा कधीच झाला नसल्याचंही तो म्हणालाय आहे. इंझमामने भारतीय संघावर टीका करताना, भारताच्या सेमी-फायनलसाठी राखीव दिवस नसणं हे भारताच्या दृष्टीने फायद्याचं आणि सोयीस्कर ठरेल असेच नियोजन करण्यात आल्याचाही आरोप केला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like