Team India | रोहित-विराटच्या निवृत्तीनंतर कशी असेल भारताची टी20तील सलामी जोडी,? ‘हे’ खेळाडू आहेत प्रबळ दावेदार

टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्माने टी20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. विराट कोहली आता टी20 मध्ये दिसणार नाही. या दोघांनी 2024 च्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावल्यानंतर ही घोषणा केली. आता टीम इंडियात नव्या खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळेल. रोहित आणि कोहलीची पोकळी भरून काढण्यासाठी अनेक खेळाडू तयार आहेत. पण संघाच्या अपेक्षांवर ते कितपत खरे ठरतील हे पाहणे बाकी आहे. सलामीवीर म्हणून यशस्वी जैस्वाल फिट आहे.

टीम इंडिया (Team India) टी-20 मध्ये यशस्वीसोबत शुभमनला सलामीवीर म्हणून निश्चित करू शकते. शुभमन तिसऱ्या क्रमांकावरही खेळला आहे. त्यामुळे तो सलामीसोबतच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. रोहित आणि विराट बाहेर पडल्यानंतर युवा खेळाडूंना अधिक संधी मिळणार आहेत.

शुभमन गिलची आतापर्यंतची कामगिरी कशी आहे?
शुभमनच्या टी20 कामगिरीवर नजर टाकली तर त्याने 14 सामने खेळले आहेत. या कालावधीत 335 धावा केल्या आहेत. त्याने भारतासाठी टी-20 मध्ये एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले आहे. शुभमनला आतापर्यंत केवळ टी-20 मध्ये भारताकडून सलामीवीर म्हणून खेळता आले आहे. एकदिवसीय आणि कसोटीतही त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. शुभमनला झिम्बाब्वे मालिकेसाठी टीम इंडियाचा कर्णधारही बनवण्यात आले आहे. त्याचा एकूण रेकॉर्ड चांगला राहिला आहे. मात्र, टी-20 विश्वचषकासाठी त्याला संघात स्थान मिळू शकले नाही.

यशस्वीची कामगिरी दमदार आहे
यशस्वीच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर नजर टाकली तर तो संघाच्या अपेक्षांवर खरा उतरला आहे. यशस्वीने भारताकडून 17 सामने खेळले आहेत. या कालावधीत 502 धावा केल्या आहेत. त्याने टीम इंडियासाठी टी-20 मध्ये एक शतक आणि 4 अर्धशतकं झळकावली आहेत. आतापर्यंत त्याला फक्त सलामीवीर म्हणून खेळण्याची संधी मिळाली आहे. यशस्वीने देशांतर्गत टी-20 सामन्यांमध्येही चांगली कामगिरी केली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like