Nikhil Wagle | ‘तुम्ही जे विष पेरलंय त्याची फळं अशीच काटेरी असतात’, पत्रकार निखील वागळेंचा कंगनाला टोला

Nikhil Wagle | बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजपाची नवनिर्वाचीत खासदार कंगना राणौत (Kangana Ranaut) हिच्यासोबत चंदीगड विमानतळावर गुरुवारी दुपारी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. CISF च्या लेडी कॉन्स्टेबलने कंगनाला चक्क कानशिलात लगावल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. दिल्लीला जाण्यासाठी बोर्डिंग करण्यापूर्वी ती सुरक्षा तपासणीसाठी उभी असताना ही घटना घडली. आरोपी महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौरला निलंबित करून ताब्यात घेण्यात आले आहे.

https://www.facebook.com/story.php?story_fbid=7601070746655868&id=100002590535571&mibextid=WC7FNe&rdid=7nk3ZZIt5np9n0Kd

या घटनेवर राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagle) यांनी या घटनेवरुन कंगनाला खोचक टोला लगावला आहे. सोशल मीडिया पोस्ट करत निखील वागळे यांनी लिहिले की, “हिसेंचं समर्थन होऊ शकत नाही. पण तुम्ही जे विष पेरलंय त्याची पळं अशीच काटेरी असतात. कळतंय ना कंगना?.” निखील वागळे यांच्या या पोस्टवरुन लोकांनीही कंगनाला जबरदस्त ट्रोल केले आहे.

कंगनासोबत विमानतळावर नेमके काय घडले?
त्याचे झाले असे की, कंगना चंदिगड विमानतळावर पोहोचल्यावर तिच्यासोबत गैरवर्तनाची ही घटना घडली. बोर्डिंग करण्यापूर्वी तिची तपासणी केली जात होती. यावेळी कंगना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत होती, त्यामुळे महिला सीआयएसएफ जवान भडकली आणि तिने कंगनाला चापट मारली. महिला कॉन्स्टेबल स्वत:ला शेतकरी आंदोलनाची समर्थक म्हणवत होती, अशी माहिती कंगनाने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत दिली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like