Sunil Tatkare | यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे ‘महाराष्ट्र धर्माचा’ संकल्प..! सुनिल तटकरे यांची प्रतिक्रीया

Sunil Tatkare | उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारचा आज सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे, “आम्ही विचारांचे वारकरी, वाहतो विकासाची पालखी” हा मुलमंत्र जपणारा अर्थसंकल्प असून राज्याच्या संपन्नता आणि समृध्दीचा दिशादर्शक अशा तरतूदी करत तळागाळातील नागरीकांना संधी व सेवांची तमाम क्षेत्र खुली करणारा अर्थसंकल्प आहे. अशी भावना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ले रायगडावर दरवर्षी राज्य सरकारच्या वतीने ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ साजरा करण्याची अर्थसंकल्पातील घोषणेचे रायगडचा खासदार म्हणून रायगडच्या नागरीकांच्या वतीने मी अजित पवार आणि महायुती सरकारचे आभार मानतो.

यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने शेतकर्याना मोफत वीज देण्याचा क्रांतीकारक निर्णय घेत बळीराजाच्या कष्टाचा आदर व सन्मान केला आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अर्थमंत्री अजित पवार यांचे आभार मानतो.

बळीराजाला दिलासा देतानाच महिला समृध्दीला सर्वोतोपरी प्राधान्य देत या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महायुती सरकारने मातृशक्तीचा सन्मान केला आहे. मुलींना मोफत शिक्षण आणि 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा दिड हजार रूपये मानधनासाठी दरवर्षी तब्बल 46 हजार कोटीची तरतूद करणारा निर्णय महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि सुधारणावादी भूमिका अधोरेखीत करणारा आहे. तसेच ‘मुख्यमंत्री अन्नपुर्ण योजने’च्या माध्यमातून पात्र कुटूंबाला वर्षाला तीन मोफत गॅस सिलींडर देणे, 25 लाख महिलांना ‘लखपती दिदी’ करणे यासारखे निर्णय स्वागतार्ह आहेत.

युवा वर्गाची शक्ती आणि राज्याच्या विकासातली ऊर्जा अधिक सक्षम व्हावी यासाठी या अर्थसंकल्पात प्राधान्य देणार्या योजनांचा समावेश देखील गौरवास्पद आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून दरवर्षी दहा लाख युवक-युवतींना प्रशिक्षण देणे, सरकारी योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी दरवर्षी 50 हजार युवकांना कार्यप्रशिक्षण देणारी महत्वकांक्षी योजना स्वागतार्ह आहेत.

समाजातील वंचित व दुर्बल घटक, दिंव्यांग आणि तृतियपंथीयांना न्यायहक्काने जगण्याचा सन्मान देणार्या योजनांचा समावेश हे या अर्थसंकल्पाचे खास वैशिष्ट आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like