Tushar Bhosale | राहुल गांधीला वारीत येण्याचं निमंत्रण द्यायचा मौलाना शरद पवारांना कोणी अधिकार दिला ?

Acharya Tushar Bhosale | लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी हिंदूबद्दल केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहल गांधींना वारीचे निमंत्रण दिले असल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन भाजप नेते आचार्य तुषार भोसले आक्रमक झाले आहेत. हिंदुंना हिंसक म्हणणाऱ्या आणि हिंदुंचा कायम तिरस्कार करणाऱ्या राहुल गांधीला वारीत येण्याचं निमंत्रण द्यायचा मौलाना शरद पवारांना कोणी अधिकार दिला ? असा सवाल त्यांनी केला आहे.

तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) म्हणाले, शरद पवारांच्या गावातून तुकोबांची पालखी शेकडो वर्षांपासून जाते पण शरद पवारांचे त्यांच्या ८४ वर्षांच्या आयुष्यात पाय कधी वारीकडे वळले नाहीत आणि ते कोणत्या तोंडाने राहुल गांधीला निमंत्रण देताहेत ? कायम इप्तार पार्ट्या झोडणारे शरद पवार आणि राहुल गांधी यांना आजपर्यंत कधीच वारी आणि वारकरी दिसले नाहीत. आता महाराष्ट्राच्या निवडणूका डोळ्यांसमोर ठेऊन तुम्ही वारीत यायला बघताय हे न कळायला महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाही हे लक्षात ठेवा, असे ते म्हणालेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like