Uttarakhand News | नऊ ट्रेकर्सचा उत्तराखंडमधील सहस्त्र तालाजवळ मृत्यू

कर्नाटकातील नऊ ट्रेकर्सचा उत्तराखंडमधील (Uttarakhand News) सहस्त्र तालाजवळ मृत्यू झाला. 22 सदस्यांच्या गटातील नऊ ट्रेकर्सचा मंगळवारी सहस्त्र तालवरून परतत असताना वाईट हवामानामुळे वाट चुकल्याने त्यांचा मृत्यू झाला. विविध आपत्ती निवारण पथकांनी संयुक्तपणे आकाशातून तसंच जमिनीवर शोध मोहीम राबवून 13 ट्रेकर्सची सुटका केली आहे.

सहस्त्र ताल ट्रेक हा उत्तराखंडच्या (Uttarakhand News) गढवाल प्रदेशात 15,000 फूट उंचीवरचा एक उंच मार्ग आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राज्यातील नऊ ट्रेकर्सचा मृत्यू झाल्याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. डेहराडूनला पोहोचलेले महसूल मंत्री कृष्णा बायरे गौडा यांनाही त्यांनी कर्नाटकातील उर्वरित सर्व ट्रेकर्सना सुरक्षित परत आणण्याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like