दहा जून हा वर्धापन दिन आम्हीच साजरा करणार, अजित पवार गटाच्या उमेश पाटलांनी ठणकावून सांगितले

Umesh Patil – निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) यांना दिलेले असल्यामुळे दिनांक १० जून हा पक्षाचा वर्धापन दिन आम्ही थाटात साजरा करणारा असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.

आजही चिन्हाबाबत न्यायालयीन लढाई सुरू असली तरी शरद पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस नावाची पार्टी नाही तर त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी हे स्वतंत्र वेगळे नाव निवडणूक आयोगाने दिले आहे. आणि चिन्हदेखील तुतारी दिली आहे त्यामुळे ज्यादिवशी नाव आणि चिन्ह त्यांना मिळाले तो दिवस ते पुढच्या वर्षी पहिला वर्धापन दिन म्हणून साजरा करतील साजरा तो त्यांना अधिकार आहे असेही उमेश पाटील म्हणाले.

२५ वा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि अजितदादा पवार यांच्यावर प्रेम करणारा प्रत्येक कार्यकर्ता तो उत्साहात साजरा करेल असेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली तारीक अन्वर, पी. ए. संगमा आणि प्रफुल पटेल या राष्ट्रीय नेत्यांनी आणि राज्यस्तरावर मधुकर पिचड, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, पद्मसिंह पाटील, अजितदादा पवार, सुनिल तटकरे, आर. आर. आबा पाटील, रामराजे नाईक निंबाळकर, हसन मुश्रीफ या सर्वांनी पक्ष वाढवला. आज समोरच्या पक्षाकडे ज्या कार्याध्यक्षा आहेत त्या स्थापनेच्या वेळी संस्थापकसुध्दा नव्हत्या असा टोलाही उमेश पाटील यांनी लगावला.

पक्षवाढीसाठी ज्यांची नावे घेतली त्यातले ९० टक्के लोक अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष ही खाजगी प्रॉपर्टी नाही ही लोकशाहीमध्ये निवडणूक आयोगाकडे रितसर नोंदणी झालेली व्यवस्था असते. राजकीय पक्ष खाजगी प्रॉपर्टी असती तर दुय्यम निबंधक यांच्याकडे नोंदणी झाली असती. त्यामुळे वंशपरंपरेने खाजगी प्रॉपर्टी ट्रान्स्फर होते तसा राजकीय पक्ष वंशपरंपरेने ट्रान्स्फर होण्याची व्यवस्था नाही. लोकशाही प्रक्रियेत ज्याच्याकडे बहुमत असते त्यांच्याकडे पक्ष जातो त्यामुळे बहुमत हे अजित पवार यांच्याकडे आहे. म्हणून आम्ही १० जूनला वर्धापन दिन देश व राज्यस्तरावर साजरा करणार आहे असेही उमेश पाटील यांनी ठणकावून सांगितले.

महत्वाच्या बातम्या :

Atul Londhe | राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला, गृहमंत्र्यांची काही जबाबदारी आहे का नाही?

Ajit Pawar | निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये

Pramod Bhangire | पुण्यातील रात्री उशिरापर्यंत चालणारे पब व हुक्का पार्लर कायमचे बंद करा, प्रमोद भानगिरेंची मागणी

You May Also Like