Team India Head Coach | टीम इंडियाला नवा मुख्य प्रशिक्षक कधी मिळणार? बीसीसीआय सचिवांनी सांगितले

Team India Head Coach | टीम इंडियाने पुन्हा एकदा टी20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. यंदाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केल्यानंतर भारताने आणखी एक आयसीसी विजेतेपद पटकावले आहे. दरम्यान, मोठी गोष्ट म्हणजे वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर लगेचच भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी20 इंटरनॅशनलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. काही वेळाने रवींद्र जडेजानेही हा फॉरमॅट सोडण्याची घोषणा केली. एवढेच नाही तर मोठी गोष्ट म्हणजे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळही संपला आहे. हा त्यांचा शेवटचा सामनाही होता.

दरम्यान, आता टीम इंडियाला नवा मुख्य प्रशिक्षक (Team India Head Coach) मिळणार आहे. गेल्या काही काळापासून बीसीसीआयकडून ही कसरत केली जात आहे. आता भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेसोबत मालिका खेळेल तोपर्यंत नवीन मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली जाईल, असे बीसीसीआय सचिवांनी स्पष्ट केले आहे.

श्रीलंका मालिकेत नवीन मुख्य प्रशिक्षक उपलब्ध होणार आहे
भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक या महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत संघात सामील होतील, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले. मात्र, राहुल द्रविड गेल्यानंतर कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले हे त्यांनी सांगितले नाही. लवकरच निवडकर्त्याचीही नियुक्ती करण्यात येणार असल्याचे जय शहा यांनी सांगितले. बीसीसीआयचे सचिव सध्या वेस्ट इंडिजमध्ये आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना जय शहा म्हणाले की, प्रशिक्षक आणि निवडकर्त्याची नियुक्ती लवकरच केली जाईल. सीएसीने दोन दावेदारांच्या मुलाखती घेतल्या असून मुंबईत गेल्यानंतर त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी करू.

आता झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची मालिका होणार आहे
आता भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी तिकडे दौऱ्यावर जाणार आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण या दौऱ्यावर जाणार आहे, मात्र नवा प्रशिक्षक केवळ श्रीलंका मालिकेशी संबंधित असेल. भारतीय संघ 27 जुलैपासून श्रीलंकेला तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी जाणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like