Sanjay Raut | ‘कॅमेरे लावून कोण ध्यानधारणा करतं? हा लोकसाधनेचा अपमान’; संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

Sanjay Raut | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुरुवारी कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे ध्यानाला सुरुवात केली. ज्या खडकावर विवेकानंदजींनीही ध्यान केले होते, त्या खडकावर बसून पंतप्रधान ध्यान करत आहेत. त्यांच्या या ध्यानधारणेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावरुन विरोधकांनी पंतप्रधान मोदींना धारेवर धरले आहे. यावर ‘कॅमेरे लावून कोण ध्यानधारणा करतं?, ४ जूननंतर चक्र उलटी फिरणार आहेत’, अशा शब्दात उबाठाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चारही बाजूंनी २७ कॅमेरे लागले आहेत. ध्यानामध्ये जो माणूस मग्न असतो तो कॅमेऱ्याकडे पाहत नाही. मात्र, पंतप्रधान मोदी चारही बांजूनी २७ कॅमेरे लावून ध्यानाला बसले आहेत. हा लोकसाधनेचा अपमान आहे. पूर्वीच्या लोकांनी ध्यानधारणा करताना किती सिक्युरिटी वापरली होती? आणि आता तीन हजार सुरक्षा रक्षक हाताशी पकडून हे ध्यान करत आहेत”, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like