NDA Meeting | एनडीएच्या बैठकीला कोण कोण होते हजर ? काय ठरलं जाणून घ्या सविस्तर

NDA Meeting | राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं केंद्रात नवीन सरकार स्थापनेसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. सत्ताधारी एनडीएने सर्वानुमते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कालच्या बैठकीत नेता म्हणून निवड केल्यानंतर सरकार स्थापनेची तयारी सुरू झाली. गेल्या दहा वर्षात मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे देशाचा प्रत्येक क्षेत्रात सर्वंकष विकास झाल्याचा ठराव काल एनडीएच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

देशातल्या जनतेनं सलग तिसऱ्या वेळी सक्षम नेतृत्वाला बहुमतानं निवडून दिल्याचंही या ठरावात (NDA Meeting) म्हटलं आहे. सरकारला मतदारांनी सलग तिसऱ्यांदा दिलेली संधी ही ऐतिहासिक घटना असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रिय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह यांच्यासह तेलगू देसम पक्षाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू, संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान, अपना दलाच्या नेत्या अनुप्रिया पटेल, आरएलडी पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे एच. डी कुमारस्वामी, हिंदुस्तान आवामी मोर्चाचे प्रमुख जीतनराम मांझी आणि जनसेना पक्षाचे पवन कल्याण यांच्यासह एनडीए चे अन्य नेते या बैठकीला उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like