Prakash Ambedkar | मोदींना कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये नामांकन का नाही? प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असतात. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) हे तामिळनाडूमध्ये ध्यानधारणेला बसले आहेत. त्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. मोदींच्या ध्यानधारणेचं लाइव्ह टेलिकास्ट करण्यापासून रोखण्यात यावं, अशी मागणी काँग्रेसने केलेली आहे. काँग्रेसच्या या आक्षेपानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही मोदींवर टीका केली आहे.

मोदी हे उत्कृष्ट अभिनेते आहेत. मला आश्चर्य वाटते की, त्यांना यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन का मिळाले नाही. अशी खोचक टीका प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी ट्विटद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.

त्यांनी म्हटले की, काही दिवसांपूर्वी मोदींनी स्वत:ची देवासोबत तुलना केली होती. जर ते खरोखरच देव असतील, तर ते कोणाशी जोडण्यासाठी ध्यान करत आहेत ?

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like