Jasprit Bumrah | रोहित-विराट-जडेजानंतर जसप्रीत बुमराहही निवृत्ती घेणार? रिटायरमेंटवर केले असे वक्तव्य

जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) 2024 च्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावण्यात भारतीय संघाकडून मोठे योगदान दिले. त्याने स्पर्धेत 8.27 च्या सरासरीने 15 विकेट घेतल्या आणि केवळ 4.18 च्या इकॉनॉमीने धावा केल्या. या शानदार कामगिरीसाठी बुमराहला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून निवडण्यात आले. आता विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांच्या निवृत्तीनंतर बुमराहने त्याच्या निवृत्तीबद्दल विधान केले.

2024 मध्ये टी20 चॅम्पियन बनताच विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्ती जाहीर केली होती. यानंतर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर एका दिवसानंतर संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजानेही टी-20 इंटरनॅशनलला निरोप दिला. आता 30 वर्षीय बुमराहनेही (Jasprit Bumrah) निवृत्तीबाबत चर्चा केली आहे.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सत्कार समारंभात बुमराह निवृत्तीबद्दल म्हणाला, “अजून खूप लांबचा पल्ला आहे. मी नुकतीच सुरुवात केली आहे. मला आशा आहे की ते अजून दूर आहे.” बुमराहने स्पष्ट केले की, सध्या कोणत्याही फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा त्याचा कोणताही विचार नाही.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like