Chitra Wagh | “तुमचा बाबासाहेबांविषयीचा आदर नकली…”, जितेंद्र आव्हाडांचा कृतीवर संतापल्या चित्रा वाघ

Chitra Wagh | राज्य सरकारच्या शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्यास अनेक नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून महाड येथील चवदार तळ्याजवळ जात त्यांनी मनुस्मृतीचे दहन केले. यावेळी त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेले मनुस्मृतीचे पोस्टर फाडून खाली फेकले. त्यांच्या या कृतीवर जोरदार टीका होत असून त्यांनी बाबासाहेबांचा अपमान केला असल्याची टीका भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केली आहे.

ए…हाडऽऽऽऽऽहाडऽऽऽऽ, तुम्ही लोकांनी आदरणीय बाबासाहेबांना निवडणुकीपुरतं वापरलं आणि आज मात्र निवडणूक संपल्यावर त्यांच्या तसबिरीच्या चिंधड्या केल्या….तुमची ही कृतीच तुमचा बाबासाहेबांविषयीचा आदर नकली असल्याचा ढळढळीत पुरावा आहे, असा घणाघात त्यांनी यावेळी केला.

तुमच्या या नौटंकीबद्दल देशातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही, असेही भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like