Shrinath Bhimale | पुण्यात झिका विषाणूचा धुमाकूळ, श्रीनाथ भिमाले यांनी आयुक्तांना लिहिले पत्र

Shrinath Bhimale | पुण्यात दिवसेंदिवस झिका विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. पुण्यात सुरुवातीला झिका विषाणूचे २ रुग्ण सापडले होते, मात्र ही रुग्णसंख्या वाढून आता ४ वर पोहोचल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे. याबाबत पुणे महानगरपालिकेने याची दखल घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. परंतु पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये या झिका व्हायरसवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून औषध फवारणी व झिका बद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. असे म्हणत माजी सभागृह नेते आणि भाजप नेते श्रीनाथ भिमाले (Shrinath Bhimale) यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे.

श्रीनाथ भिमाले यांनी आपल्या पत्रात पुढे असं म्हटलं आहे की, पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये झिका चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक औषध फवारणी व जनजागृती करण्याबाबत संबंधित यंत्रणेला आपण सुचित करावे.

तसेच महानगरपालिकेच्या रूग्णालयांमध्ये झिका या रोगाचा संसर्ग झाल्यानंतर करावयाच्या औषध उपचाराबाबत सर्व वैद्यकीय सुविधा व औषध उपचारासाठी आवश्यक त्या बाबींची देखील उपलब्धता असावी. याबाबत आरोग्य विभागास सुचना द्याव्यात. अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like