Ambadas Danve | अंबादास दानवेंना शिवीगाळ भोवली, विधानपरिषदेतून पाच दिवसांसाठी निलंबित

काल विधीमंडळात उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्यात तू तू मैं मैं झाली. दानवे यांच्या याच शिवराळ भाषेवर आज प्रसाद लाड चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी अंबादास दानवे यांच्या निलंबनाची तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आल्याची घोषणा नीलम गोऱ्हे यांनी केली.

अंबादास दानवेंनी (Ambadas Danve) आपल्याकडे हात करणाऱ्या प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आज भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. अंबादास दानवेंनी माफी मागावी, आणि त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली. तर चंद्रकांत पाचील यांनी दानवेंच्या निलंबनाची मागणी केली. यानंतर आता अंबादास दानवेंवर कारवाईटा बडगा उगारला आहे.

उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या, गटनेत्यांच्या बैठकीला आंबादास दानवे उपस्थित नव्हते. कालच्या प्रकाराबाबत त्यांनी माफी मागितली नाही. काल आमच्या समोर हा प्रकार घडला. त्यांच्या पक्षाच्या नेतेमंडळीनी विचार करायला हवं की, संबंधित व्यक्ती महिलांसमोर अशी भाषा वापरत आहे, हे गंभीर आहे. महिलांना काम करणं भविष्यात मुश्किल होईल. म्हणून ही न्याय आणि उचित कारवाई केली आहे, असे त्यांनी म्हटले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like