Collector Dr. Suhas Diwase | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी मोहिम राबवा

Collector Dr. Suhas Diwase | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) ही शासनाची महत्वाची योजना असून या योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांना मिळावा यासाठी योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी मोहिमस्तरावर कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे, सर्व उपविभागीय अधिकारी, गट विकास अधिकारी आदी उपस्थित होते.

डॉ.दिवसे (Collector Dr. Suhas Diwase) म्हणाले, योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी गावपातळीवर सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. ग्रामीण भागातील अल्पभूधारक महिलांची यादी उपलब्ध असून त्यांच्याकडून त्वरीत अर्ज भरून घ्यावे. सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ देण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. शहरी भागात योजनेचा अर्ज भरण्यासाठी आवश्यक दाखले गतीने उपलब्ध करून द्यावेत. यासोबत विविध विभागांकडे उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून पात्र महिलांची यादी तयार कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

पात्र महिलांच्या याद्या प्राप्त झाल्यावर गावपातळीवर त्यांच्याकडून अर्ज भरून घेण्याची कार्यप्रणालीही निश्चित करावी, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील म्हणाले, योजनेची माहिती गावपातळीवर पोहोचविण्यासाठी माहिती पत्रके तयार करण्यात यावीत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like