Eknath Shinde | ज्यांना सख्खे भाऊ नाही समजले त्यांना ‘लाडकी बहीण’ काय कळणार?; मुख्यमंत्र्यांचे सडेतोड प्रत्युत्तर

Eknath Shinde | सध्या महाराष्ट्रात सर्वत्र लाडकी बहिण योजनेची चर्चा होत आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना महिलांसाठी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. १ जुलैपासून राज्यभरात ही योजना लागू झाली असून त्याचे ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी महिलांची सेतू केंद्राबाहेर गर्दी जमत आहे. परंतु विरोधक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन राज्य सरकारवर निशाणा साधत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका करताना लाडकी बहीण योजना आणली, लाडका भाऊ का नाही? लाडका भाऊ योजना आणायला काही हरकत नाही. सरकारने मुलं आणि मुली यात भेदभाव करू नये, असं म्हटलं होतं.

आता उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माता भगिनींचा सन्मान करणं ही आपल्या राज्याची संस्कृती आहे. काही लोक म्हणाले लाडकी बहीण योजना आणली. भावाचे काय? ज्यांना सख्खा भाऊ समजला नाही. त्यांना योजना तरी कशी कळणार?, असा टोला लगावतानाच ज्या घरातली लक्ष्मी सुखी, त्या घरात समृद्धी पक्कीच समजा. आपण मुलींचं संपूर्ण उच्च शिक्षण मोफत करणार आहोत. आपण कुणाला काही द्यायचं ठरवलं तर यांच्या पोटात दुखू लागतं. त्यांना द्यायची माहिती नाही. त्यांचं मन निर्मळ नाही. नाही निर्मळ मनं, काय करेल साबणं, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like