Sadabhau Khot | ‘माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील…’, विधानपरिषदेवर वर्णी लागताच सदाभाऊ खोत यांची पहिली प्रतिक्रिया

Sadabhau Khot | भाजपाने विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाच्या केंद्रीय समितीने 5 नावांवर शिक्कामोर्तब केला आहे. यामध्ये पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांच्या नावांचा समावेश आहे. भाजपने रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेसाठी संधी दिल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) म्हणाले की, “राज्यातील शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार यांच्यासाठी मी ही उमेदवारी समर्पित करतो. सर्व घटकांना घेऊन जाणारा भारतीय जनता पक्ष आहे. १८ पगड जातींना एकत्र ठेवण्याचे काम खऱ्या अर्थाने भाजपने केले आहे. माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील, शेतकरी चळवळीतील, सामान्य कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने एक मोठी संधी भाजपने दिली आहे. मी याबद्दल निश्चित ऋणी राहिन”, असेही सदाभाऊ खोत यांनी म्हटले.

“भाजप सर्वसामान्य बहुजनांचा पक्ष”
“सर्वसामान्य बहुजनांचा पक्ष म्हणून भाजपकडे बघावं लागेल. या पक्षाने रामदास आठवले, माधव जानकर, गोपीचंद पडळकर, पंकजा मुंडे या सर्व घटकांना, तळातल्या माणसांना वर घेऊन जाण्याचे काम भाजपने सुरुवातीपासून केले आहे. तसेच निश्चित सर्वसामान्यांची बाजू घेऊन लढणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम हे भाजपने केले आहे”, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like