यापुढेही असेच लोकहिताचे निर्णय हे सरकार घेईल हीच अपेक्षा; पेट्रोल-डीझेल दर कपातीच्या निर्णयाचे मनसेकडून स्वागत

Mumbai – राज्यातील पेट्रोलच्या (Petrol) करात पाच रुपये प्रति लीटर आणि डिझेलच्या (Diesel) करात तीन रुपये इतकी कपात करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. कर कपातीचा निर्णय (Tax deduction decision) आज ( १४ जुलै) मध्यरात्रीपासून लागू होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्य सरकारने जाणीवपूर्वक राज्यातील पेट्रोलच्या करात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या कर कपातीमुळे राज्यातील जनतेला महागाईपासून दिलासा (Relief from inflation) मिळेल. या कर कपातीच्या घोषणेमुळे राज्यातील जनतेला ६ हजार कोटी रुपयांच्या करातून दिलासा मिळेल.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil ) यांनी कौतुक केले आहे. आज मध्यरात्रीपासून पेट्रोल ५ रूपयांनी व डिझेल ३ रूपयांनी स्वस्त होणार. यापुढेही असेच लोकहिताचे निर्णय हे सरकार घेईल या अपेक्षेसह शिंदे-फडणवीस सरकारचे मनसे आभार ! असं म्हणत त्यांनी या निर्णयाचे समर्थन (Decision support)  केले आहे.