Sunil Tatkare | नागोठण्यातील ऐतिहासिक सभा माझ्या विजयावर शिक्कामोर्तब करेल

Sunil Tatkare | उद्याचे भवितव्य घडवण्यासाठी एकत्रितपणे काम करुया असे आवाहन करतानाच २०१९ च्या विजयाची पुनरावृत्ती होताना त्यापेक्षा जास्त नागोठणे येथील ऐतिहासिक सभा विजयावर शिक्कामोर्तब करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी नागोठणे येथील जाहीर प्रचार सभेत व्यक्त केला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राममंदिराचे काम पूर्ण झाले आणि आता बाबरी मशीदीचेही काम सुरू आहे ही धर्मनिरपेक्षता मोदी सरकारमध्ये आहे. मात्र समाजासमाजामध्ये वाद निर्माण करुन विरोधक आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे त्या विषारी प्रचारापासून सावध व्हा असे आवाहन सुनिल तटकरे यांनी केले.

धर्म निरपेक्ष विचार आमच्या रोमारोमात आहेत असे सांगतानाच इथल्या स्थानिकांना शंभर टक्के रोजगार उपलब्ध होतील असे काम करणार असल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol : पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याला प्राधान्य असेल, मुरलीधर अण्णांचा विश्वास

Narendra Modi : शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ, नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल

Vijay Shivtare : सुनेत्रा पवारांना फक्त उमेदवारी मिळाल्यावर किती बदल झाला, खासदार झाल्यावर तर काय होईल?