Uddhav Thackeray | “हे ठरवून रचलेले षडयंत्र”, अंबादास दानवेंना निलंबित करताच उद्धव ठाकरे संतापले, केले गंभीर आरोप

Uddhav Thackeray | उबाठा गटाचे नेते अंबादास दानवेंनी काल विधीमंडळात आपल्याकडे हात करणाऱ्या प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आज भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. अंबादास दानवेंनी माफी मागावी, आणि त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली. यानंतर आता अंबादास दानवेंवर कारवाईटा बडगा उगारला आहे. अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आल्याची घोषणा नीलम गोऱ्हे यांनी केली.

यामुळे विरोधक चांगलेच संतापले आहेत. विधान परिषदेच्या सभापतींनी घेतलेल्या या निर्णयावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. . “खरंतर अंबादास दानवे यांना भूमिका मांडण्यासाठी संधी द्यायला हवी होती. त्यांना वेळ द्यायला हवी होती पण वेळ देण्यात आली नाही. आम्हाला कुणाला बोलू दिलं गेलं नाही. जणू काही सर्व ठरवूनच षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्याला निलंबित केलं गेलं आहे, हे असं कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा झाला असेल. हा सर्व अन्याय महाराष्ट्राची जनता डोळे उघडून पाहते आहे”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपली भूमिका मांडली.

“आपल्याला कल्पना आहे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निलंबित केलं गेलं आहे. खरं पाहिलं तर एखादा प्रस्ताव आल्यानंतर, माझ्या बाजूला दोन्ही विधीमंडळाचे ज्येष्ठ सदस्य आहेत. एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर चर्चा करणं गरजेचं असतं. दुसरी बाजू मांडू देणं हे लोकशाहीसाठी आवश्यक असतं. त्याचा निर्णय घेणं अपेक्षित असतं. निलंबन करण्याचा अधिकार हा अध्यक्ष किंवा सभापतींचा असतो. पण त्यासाठी एकतर्फी निर्णय, एका कुणाकडून मागणी झाली, म्हणून निर्णय घेतला हे लोकशाहीला घातक आहे, लोकशाहीला मारक आहे, हा लोकशाहीच्या विरोधातील निर्णय आहे”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like