Lok Sabha Election Results : बीडमधून पंकजा मुंडे पिछाडीवर, बजरंग सोनवणेंकडे 1359 मतांची आघाडी

Lok Sabha Election Results 2024 Live : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुक २०२४ चा निकाल आज जाहीर होणार आहे. प्राथमिक कलांनुसार देशात तिसऱ्यांदा एनडीए सरकारची सत्ता येण्याची शक्यता आहे. भाजपाने ‘अबकी बार ४०० पार’चा नारा लगावला असून नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होणार का हे आजच्या निकालावरुन स्पष्ट होणार आहे.

देशात या लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच महाराष्ट्रातील निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. यंदा राज्यातील निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली असून अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीनंतर भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी 21755 मतांसह 1359 मतांची आघाडी घेतली आहे. पंकजा मुंडे यांना आतापर्यंत 20396 मते पडली असून दोघांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप