Hardik Pandya : लखनऊविरुद्धच्या पराभवानंतर हार्दिकच्या जखमेवर मीठ, झाला २४ लाखांचा दंड

Hardik Pandya : आयपीएल 2024 मध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्सला सातव्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली मुंबईसाठी प्लेऑफचा मार्ग कठीण झाला आहे. मात्र, या पराभवानंतर हार्दिकला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. स्लो ओव्हर रेटसाठी बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने त्याला 24 लाखांचा दंड ठोठावला आहे. त्याच्याशिवाय मुंबईच्या इतर खेळाडूंनाही दंड ठोठावण्यात आला आहे. मंगळवारी एकाना येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात लखनौने मुंबईचा चार गडी राखून पराभव केला.

हार्दिक दुसऱ्यांदा दोषी ठरला
हार्दिकला या मोसमात दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. याआधी तो मुल्लानपूरमध्ये पंजाब किंग्जविरुद्धही दोषी आढळला होता. आयपीएलच्या अधिकृत विधानानुसार, उर्वरित मुंबईच्या खेळाडूंना (इम्पॅक्ट प्लेअरसह) 6 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. जे कमी असेल ते लागू होईल.

आणखी कर्णधारांना दंड ठोठावण्यात आला आहे
याआधी दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत, कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि चेन्नईचा कर्णधार रुतुराज गायकवाड यांनाही स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमावून 144 धावा केल्या. इशान किशनने 36 चेंडूत 32 धावा, नेहल वढेराने 41 चेंडूत 46 धावा आणि टीम डेव्हिडने 18 चेंडूत नाबाद 35 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौने 19.2 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले. केएल राहुलने 22 चेंडूत 28 धावा केल्या. तर मार्कस स्टॉइनिसने 45 चेंडूत 62 धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या-

टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, रोहितच्या नेतृत्वाखाली खेळणार हार्दिक पांड्या

Anis Sundke | हा देश जितका हिंदूंचा तितकाच मुलमानांचा सुद्धा, अनिस सुंडके यांचे प्रतिपादन

शिवसेना शिंदे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून रविंद्र वायकर यांना उमेदवारी

You May Also Like