T20 World Cup 2024 | टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, रोहितच्या नेतृत्वाखाली खेळणार हार्दिक पांड्या

एकीकडे आयपीएल 2024 ची रणधुमाळी सुरू असताना आगामी टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या संघात अष्टपैलू हार्दिक पांद्याला संधी देण्यात आली आहे.

संघात दोन यष्टिरक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ऋषभ पंत आणि संजू सॅमसन आहे. त्याचबरोबर केएल राहुलला संघातून वगळण्यात आले आहे. राहुल गेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा भाग होता.

टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ (India Squad for T20 World Cup 2024) : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

राखीव : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मोदींच्या नेतृत्वात भारत बनेल तिसरी मोठी अर्थव्यवस्था, मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास

Eknath Shinde | ज्या गोष्टीचा खेद वाटायला हवा त्याचा उबाठाला अभिमान वाटतोय

Narendra Modi | ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कर्नाटकी कट हाणून पाडा, पंतप्रधान मोदींचे आवाहन