Anis Sundke | हा देश जितका हिंदूंचा तितकाच मुलमानांचा सुद्धा, अनिस सुंडके यांचे प्रतिपादन

Anis Sundke | सर्वधर्म समभाव असणारा आपला भारत देश कधीही धार्मिक किंवा जातीय राजकारणाचा भाग झाले नाहीत. पण आता देशात हिंदू मुसलमान असा भेदभाव केला जातो जो चुकीचा आहे. हा देश जितका हिंदूंचा आहे तितकाच मुसलमानांचा सुद्धा आहे असे प्रतिपादन एमआयएम चे पुणे लोकसभेचे उमेदवार अनिस सुंडके यांनी केले आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची पुण्यात प्रचार सभा झाल्यानंतर त्यांच्या वक्तव्याचा विरोध करून अनिस सुंडके (Anis Sundke) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

एमआयएम चे उमेदवार अनिस सुंडके म्हणाले कि, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काल पुण्यात आले होते. त्यांनी मुस्लिम ओबीसी आरक्षणाबाबत वक्तव्य केले, की ओबीसी आरक्षणावर मुस्लिमांनी डाका घातलेला आहे. आणि हे सर्व कर्नाटकात काँग्रेसच्या सरकारने केलं असल्याचं त्यांनी म्हटले आहे. पण मी हे सांगू इच्छितो की हा हिंदुस्थान जितका हिंदूंचा आहे तितकाच मुसलमानांचा सुद्धा आहे हे पंतप्रधान पदी विराजमान असलेल्या मोदींनी लक्षात घेतलं पाहिजे. सत्तेत जितका हिंदूंचा अधिकार आहे तितकाच मुसलमानांचा सुद्धा अधिकार आहे. त्यामुळे यनिमित्ताने मी माझ्या मुसलमान बांधवांना सांगू इच्छितो की, पंतप्रधानांना कोणतेही काम राहिलेलं दिसत नाही त्यांना कोणतेही विकासाचे काम सांगू वाटत नाही. फक्त हिंदू आणि मुसलमान या दोन धर्माच्या लोकांमध्ये भांडणे लावण्यात हे धन्यता मानतात. त्यामुळे या निमित्ताने मी सांगू इच्छितो कि, या देशावर जितका हिंदूंचा हक्क आहे तितकाच मुसलमानांचा सुद्धा हक्क आहे.” असे ते म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मोदींच्या नेतृत्वात भारत बनेल तिसरी मोठी अर्थव्यवस्था, मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास

Eknath Shinde | ज्या गोष्टीचा खेद वाटायला हवा त्याचा उबाठाला अभिमान वाटतोय

Narendra Modi | ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कर्नाटकी कट हाणून पाडा, पंतप्रधान मोदींचे आवाहन