Pankaja Munde | ‘माझ्यासाठी बलिदान देणाऱ्या पाच जणांच्या चरणी माझं यश अर्पण’, विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे भावूक

Pankaja Munde | भाजपाने विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाच्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेसाठी संधी देण्यात आली आहे. आज त्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तत्पूर्वी वरळीत माध्यमांशी बोलताना त्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या की, मी आजच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक करत आहे. चांगल्या वाईट काळात मला संधी दिली आहे. जेपी नड्डा, अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे, या सगळ्यांचे आभार मानते. मला प्रतीक्षा करावी लागली, आज लोकांना हवं ते झालं आहे. मला आज जे काही मिळतंय ते पाच जीवांच्या चरणी अर्पण करते. आज ते इकडे असते तर घोषणा दिल्या असत्या. त्यांना मी समर्पित करते, असे म्हणत पंकजा मुंडे विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी भावूक झाल्याचे दिसून आले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like