Ladki Bahin Yojana | ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’साठी आजपासून ऑफलाईन अर्ज; पात्र, अपात्रतेचे निकष काय?

Ladki Bahin Yojana | महाराष्ट्रातील महिलांना दर महिन्याला मिळमार दीड हजार रुपये.. वर्षभरात खात्यात जमा होणार अडीच लाख.. सध्या महाराष्ट्रात सर्वत्र लाडकी बहिण योजनेची चर्चा होत आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना महिलांसाठ लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. १ जुलैपासून राज्यभरात ही योजना लागू झाली असून त्याचे ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी महिलांची सेतू केंद्राबाहेर गर्दी जमत आहे. पण कोणत्या महिला (Ladki Bahin Yojana) या योजनेचा लाभ घेऊ शकतात ते पाहूया..

कोणत्या महिला ठरतील पात्र?
लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी असणं आवश्यक आहे.
राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, पतीने सोडून दिलेल्या आणि निराधार महिला याचा लाभ घेऊ शकतात
किमान वयाची 21 वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत महिलांना पैसे मिळतील
या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे बैंक खाते आवश्यंक आहे.
महत्त्वाचे म्हणजे, महिले्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं.

कोणत्या महिला असतील अपात्र?
ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल, त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, त्या कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.
जर अर्ज कणाऱ्या महिलेने यापूर्वी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला असेल, तर त्यांनाही पैसे मिळणार नाहीत.
तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार असतील.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य असतील.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल.
ज्यांच्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहने असतील, त्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like