Paul Coughlin Catch Video | हे कसे घडले..! स्वत:चं डोकं वाचवायला गेला अन् गोलंदाजाने अविश्वसनीय झेल टिपला, Video

Paul Coughlin Catch Video | क्रिकेट चाहत्यांच्या नजरा सध्या टी20 विश्वचषक 2024 वर खिळल्या आहेत. त्याचवेळी इंग्लंडमध्ये टी-20 ब्लास्ट स्पर्धा होत आहे. टी20 विश्वचषक 2024 मुळे चाहते या स्पर्धेकडे लक्ष देत नाहीत. मात्र, डरहॅम संघाकडून खेळणारा वेगवान गोलंदाज पॉल कफलिनने आश्चर्यकारक झेल घेतला आहे. हा झेल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या झेलचा व्हिडिओ इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सनेही सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अलीकडेच टी-20 ब्लास्टमध्ये डरहम आणि लँकेशायर यांच्यात सामना झाला. या सामन्यात मॅथ्यू हर्स्टने वेगवान गोलंदाज पॉल कफलिनच्या चेंडूवर पुढे जात मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्याने हा शॉट मोठ्या ताकदीने मारला. या वेळी स्वत:ला वाचवण्यासाठी अवघ्या काही सेकंदांचा अवधी होता. डोके वाचवण्यासाठी त्याने हात पुढे करताच चेंडू त्याच्या हातात आला. कफलिनचा हा झेल पाहून सर्वांनाच धक्का बसला. जर कफलिनने हा झेल पकडला नसता तर तो जखमी झाला असता.

बेन स्टोक्सनेही हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे
इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सही हा झेल पाहून अवाक झाला. या कॅचचा व्हिडिओही (Paul Coughlin Catch Video) त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हे कसे घडले? हा विनोद नाही.

डरहॅम जिंकला
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर डरहम संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 गडी गमावून 218 धावा केल्या. या सामन्यात डर्बनकडून ग्रॅहम क्लार्कने 87 तर बेडिंगहॅमने 78 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना लँकेशायर संघाला 20 षटकांत केवळ 216 धावा करता आल्या. डरहमसाठी कॅलम पार्किन्सनने 3 आणि पॉल कॉफलिनने 2 बळी घेतले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप