Rahul Gandhi | “राहुल गांधींनी नाक घासून माफी मागावी; आम्ही हिंदू आहोत हे अभिमानाने सांगा”, भाजप आक्रमक

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संसदेत हिंदुविरोधी विधान केल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येत आहे. त्यांच्या या विधानामुळे सत्ताधारी काँग्रेसवर सडकून टीका करत आहेत. अशातच आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना राहुल गांधींनी तातडीने नाक घासून माफी मागावी, असं म्हटलं आहे.

मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, “राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विधानाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या मंदिराच्या आतमध्ये विरोधी पक्षनेत्याने हिंदू समाजाला लाजवेल असं विधान केलं आहे. हिंदूंना हिंसक म्हणणाऱ्या त्यांच्या मानसिकतेचं हे प्रतिबिंब आहे.”

“संपूर्ण जगात भारत हा एकमेव देश आहे जिथे हिंदू एवढ्या मोठ्या संख्येने आहेत आणि विरोधी पक्षाच्या नेत्याने असं विधान केलं तर हिंदू ते कसं सहन करतील. यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नाक घासून माफी मागावी.”

“आम्ही हिंदू आहोत हे अभिमानाने सांगा. मी हिंदू आहे हे मी अभिमानाने सांगतो. राहुल गांधींच्या या विधानामुळे सर्वांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्यांनी तात्काळ माफी मागावी. मी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना आवाहन करणार आहे. त्यांचा राजीनामा मागा, तसेच राहुल गांधींच्या विधानाशी पक्ष सहमत आहे की नाही, हे काँग्रेसने स्पष्ट करावे.” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like