Tamhini Ghat | हुल्लडबाजी जीवावर! पिंपरी चिंचवडमधील तरुण ताम्हिणी घाटातील धबधब्यात गेला वाहून

Tamhini Ghat  | वर्षाविहारासाठी लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात पर्यटनासाठी आलेले एकाच कुटुंबातील पाच जण धबधब्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भुशी डॅमच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटर फॉल येथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेले आहेत. ग्रामस्थ, वन्यजीव रक्षक, पोलीस यांच्या मदतीने शोधमोहीम सुरू आहे मात्र, त्यांचा शोध लागला नाही.

ही घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवड येथील स्वप्नील धावडे हा तरुण ताम्हिणी घाटातील (Tamhini Ghat ) धबधब्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्याची बातमी आली आहे. आपल्या व्यायाम शाळेतून इतर 32 जणांच्या गटासह गेलेला धावडे पाण्यात उडी मारून बेपत्ता झाला. हा ग्रुप शनिवारी वीकेंडला सहलीसाठी मुळशी तालुक्यातील प्लस व्हॅली येथे गेला होता. यावेळी उत्साही धवडेने धबधब्यात उंचावरून झेप घेतली. परंतु पाण्याचा प्रवाह खूप जोरदार असल्याने त्याला स्वत:ला सावरतला आले नाही. आसपास पकडण्यासाठी कशाचा आसराही मिळाला नसल्याने तो धबधब्यात वाहून गेला. हा चित्तथरारक क्षण कॅमेरात कैद झाला असून याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

शोध मोहीम तात्काळ सुरू करण्यात आली होती, परंतु शनिवारी किंवा रविवारी धवडे शोधण्यात अधिकारी असमर्थ ठरले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like