‘नेहमी मजबूत असणारे बच्चू भाऊ कडू खोक्याच्या ओझ्याने ‘मजबूर’ झाले आहेत’

अमरावती : आमदार बच्चू कडू (Bachhu kadu) यांनी अखेर मंत्री पदाचा दर्जा जाहीर झाला आहे. दिव्यांग कल्याण खात्याचे अभियान दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्यासाठी बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलाय. बच्चू कडू यांची दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी या अभियानाचे अध्यक्ष म्हणून निवड झालीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार बच्चू कडू यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा जाहीर करण्यात आला. याबाबतचे परिपत्रक शासनाकडून काढण्यात आले आहे.

दरम्यान, या घडामोडींवरून आता राष्ट्रवादीकडून बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केलीय. शिंदे-फडणवीस यांनी आमदार बच्चू कडू यांना मंत्री पदाचा नुसता र्जा देऊन दुधाची तहान ताकावर भागवली. नेहमी मजबूत असणारे बच्चू भाऊ कडू खोक्याच्या ओझ्याने मजबूर झाले आहेत …छुपाना भी नहीं आता,बताना भी नहीं आता …त्यांची अशी अवस्था झाली आहे.असं चव्हाण यांनी म्हटले आहे.

 

You May Also Like