T20 World Cup 2024 | टी20 विश्वचषकासाठी दुबेची निवड कशाच्या आधारावर केली? कर्णधार रोहितने सांगितले मोठे कारण
![T20 World Cup 2024 | टी20 विश्वचषकासाठी दुबेची निवड कशाच्या आधारावर केली? कर्णधार रोहितने सांगितले मोठे कारण](https://i0.wp.com/azadmarathi.com/wp-content/uploads/2024/05/dube.webp?resize=750%2C400&ssl=1)
टी20 विश्वचषक 2024 साठी (T20 World Cup 2024) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली. दोघांनी नुकत्याच जाहीर झालेल्या टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी (T20 World Cup 2024) भारतीय संघाबाबत चर्चा केली आणि निवडीबाबत आपले मत मांडले.
🗣️🗣️ One thing we really looked at was our middle-overs hitting. #TeamIndia Captain Rohit Sharma on the batting options and combinations for the #T20WorldCup@ImRo45 pic.twitter.com/JmHqSZZt9L
— BCCI (@BCCI) May 2, 2024
पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार रोहित शर्माला शिवम दुबेच्या निवडीबाबत विचारण्यात आले. रोहित शर्माला विचारण्यात आले की शिवम दुबेची आयपीएलमधील कामगिरी पाहून त्याची निवड करण्यात आली आहे का? यावर रोहित शर्मा म्हणाला की, शिवम दुबेच्या आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावरच आम्ही हे केले आहे. मात्र, त्याने भारतासाठी खेळलेल्या इतर डावांचाही उल्लेख केला.
‘गरज पडल्यास गोलंदाजी करू शकतो’
रोहित म्हणाला, आमची टॉप ऑर्डर आक्रमक फलंदाजी करते आणि ती वाईट नाही. मधल्या षटकांमध्ये कोणीतरी अशीच भूमिका बजावून मोकळेपणाने खेळावे अशी आमची इच्छा होती. शिवम दुबे त्यापैकीच एक. तो आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहे. यापूर्वी त्याने भारताकडून खेळलेल्या काही डावांमध्ये अशी कामगिरी केली आहे. आम्ही याबद्दल बोललो आणि त्याची निवड केली कारण तो गोलंदाजीचे पर्याय देखील देतो आणि गरज पडल्यास गोलंदाजी करू शकतो.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ:-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बब्रुमराह, आर. मोहम्मद सिराज.
राखीव-
रिंकू सिंग, शुभमन गिल, खलील अहमद आणि आवेश खान
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Ramdas Athawale | कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलले जाणार नाही, रामदास आठवलेंची ग्वाही
Ravindra Dhangekar | आता जनतेला अंधे, मुके आणि बहिरे सरकार नकोय, धंगेकर यांची मोदीं सरकरावर टीका
Devendra Fadnavis | …तुम्ही कफन चोर आहात, देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल