जनतेच्या मनात मोदींची प्रतिमा कुटुंबप्रमुखाची; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

Chandrashekhar Bawankule: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) कर्तृत्व संपूर्ण देशाने मान्य केले आहे. जनतेच्या मनात पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल कुटुंबप्रमुख ही भावना आहे व ते देखील जनतेला आपल्या कुटुंबाप्रमाणे मानतात. हेच शिल्लक सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे दुखणे आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ‘माझं कुटुंब- माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) ते कळणार नाही.

ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते. बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली, ते म्हणाले, हिंदुत्वाचा वारसा मिळूनही उद्धव ठाकरे यांना ‘इंडी’ आघाडीचे गोडवे गावे लागत आहेत. त्यांनी शिवतीर्थावर काँग्रेस धार्जिणी भूमिका घेत पुन्हा एकदा हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनबद्दल बोलतील, असे वाटले होते, पण ते मूग गिळून गप्प बसले. कंत्राटीभरती सुरू केल्याबद्दल महाराष्ट्रातील तरुणांची माफी मागतील, अशी आशा होती, परंतु, त्यांना महाराष्ट्रातील तरुणांपेक्षा स्वतःच्या मुलाच्या भविष्याची चिंता जास्त आहे. महाराष्ट्राची जनता त्यांना सोडणार नाही.

उद्धव ठाकरे यांच्याजवळ विकासाचा अजेंडा आणि विकासाचे व्हिजनही नाही. त्यांना कॉंग्रेस आणि शरद पवारांची वकिली करावी लागत आहे. शरद पवारांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ते आणखीच बिघडले आहे, असाही टोला त्यांनी लगावला.

• जरांगे पाटलांनी धीर धरावा
मराठा आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKnath Shinde) यांनी दिला आहे. मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले होते. ते उद्धव ठाकरेंनी घालविले. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी थोडी वाट पाहावी.

• पंकजा मुंडे आमच्या नेत्या
पंकजा मुंडे (Pankaja Munde) आमच्या नेत्या आहेत. त्या पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीतील पदाधिकारी आहेत. त्यांच्या निवडणुकीबद्दलचा निर्णय केंद्रीय पार्लियामेंट्री बोर्ड घेईल. त्यांच्या पाठिशी भाजपा पूर्ण ताकदीने उभी आहे. भाजपाचा राज्यात विस्तार करण्यासाठी त्या मदत करतील असाही विश्वास श्री बावनकुळे यांनी व्यक्त केला.

https://youtu.be/Tt-1tSruXa0?si=kwbpullEutXoNovU

महत्वाच्या बातम्या-

‘उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील तरुणांपेक्षा स्वतःच्या मुलाच्या भविष्याची चिंता’

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला क्लिन बोल्ड केल्यानंतर शोरिफुलचे हृतिक स्टाईल सेलिब्रेशन, Video Viral

तुमची खोक्याची लंका दहन करण्यासाठी ‘मशाल’ माझ्याकडे आहे; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल