Team India Victory Parade | भारताच्या विजयी यात्रेला गालबोट लागू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना

Team India Victory Parade | टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे मुंबईत आगमन झाले आहे. मुंबई विमानतळावर भारतीय संघाचे विमान उतरताच अनोख्या स्टाईलमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले. भारतीय संघाच्या विमानासमोर पाण्याचा फव्वारा उडवत त्यांना अनोखी सलामी देण्यात आली. त्यानंतर विमानासमोर एका रांगेत चार गाड्या धावल्या, ज्यांवर भारताचा तिरंगा फडकताना दिसला. या शानदार स्वागतानंतर भारतीय संघ मिरवणुकीच्या बसच्या दिशेने रवाना झाला आहे. दरम्यान भारतीय संघाच्या विजय यात्रेसाठी मुंबईत क्रिकेटचाहत्यांची तुडुंब गर्दी भरली आहे.

टि-20 विश्वचषक विजेता भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी (Team India Victory Parade) जमलेल्या क्रिकेट प्रेमींच्या गर्दींचे संनियत्रण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना निर्देश दिले आहेत. विजयवीर संघाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम तसेच नरीमन प्वाईंट ते स्टेडियम दरम्यान, मरिन ड्राईव्ह या परिसरात मोठी गर्दी झाली आहे. या गर्दीमुळे वाहतुक विस्कळीत होऊ नये तसेच जमलेल्या क्रिकेट प्रेमींचीही गैरसोय होऊ नये याकडे मुंबई पोलीस दल आणि संबंधित यंत्रणांनी लक्ष पुरवावे, अनुषांगिक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दुरध्वनीद्वारे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिल्या आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like