Bhausaheb Rangari Ganapati | ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’तर्फे वारकरी सेवा, पुरवली भोजनाची व्यवस्था

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव अशी ओळख असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या (Bhausaheb Rangari Ganapati) माध्यमातून पुण्यात मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या सेवेचा हजारो वारकरी मंडळींनी लाभ घेतला.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संतश्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुण्यात आगमन झालं. दोन्ही पालख्या या दोन दिवस पुण्यात मुक्कामी असल्याने पुणेकरांनी मोठ्या उत्साहात पालख्यांचं स्वागत केल. पालख्यांसोबत असलेल्या वारकऱ्यांमुळे संपूर्ण शहरातील वातावरण हे भक्तीमय झाले आहे. विविध मंडळे, संस्था, संघटना यांच्याकडून या वारकऱ्यांची वेगवेगळ्या प्रकारे सेवा करण्यात येत आहे. ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ (Bhausaheb Rangari Ganapati) च्यावतीनेही मंदिरापुढे वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी दर्शनासाठी आलेल्या अनेक भाविकांनीही वारकऱ्यांना भोजन वाढून त्यांची सेवा केली.

दरम्यान, मुंबई येथील लिव्हर ट्रान्स्प्लान्ट स्पेशालिस्ट डॉ. कैलास जवाडे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळयासोबत पुणे ते जेजुरीपर्यंत तर तुकोबांच्या पालखीसोबत पुणे ते अकलूजपर्यंत पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी त्यांच्याकडून मोफत वैद्यकीय सेवा आणि चरण सेवा (मॉलिश) केली जाते. त्यांच्यासाठी ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या माध्यमातून आवश्यक ती औषधे उपलब्ध करुन देण्यात आली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like