Rohit Sharma | रोहित शर्माने बार्बाडोसच्या खेळपट्टीची माती का खाल्ली? कारण ऐकून व्हाल भावूक

Rohit Sharma | टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. या सामन्यातील विजयासह टीम इंडियाने 17 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर टी20 विश्वचषक ट्रॉफी जिंकली. ही ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्माच्या भावना दिसल्या. टीम इंडियाचे सर्व खेळाडू मैदानाच्या मध्यभागी भावूक झाले आणि एकमेकांना मिठी मारून विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

यानंतर भारतीय कर्णधाराने बार्बाडोसच्या खेळपट्टीची माती खाल्ली आणि नंतर तिरंगा जमिनीवर गाडला. रोहितचे बार्बाडोसच्या खेळपट्टीची माती खाल्ल्याचे फोटो पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला, पण हिटमॅनने ही माती का खाल्ली? या क्षणाबाबत असा अंदाज वर्तवला जात होता की, टेनिस दिग्गज नोव्हाक डिकोविचने ग्रँडस्लॅम जिंकल्यानंतर विम्बल्डनचे गवत खाल्ले होता, मात्र आता रोहितने बार्बाडोसच्या खेळपट्टीची माती खाल्ल्याचा मोठा खुलासा केला आहे.

टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) बार्बाडोसच्या खेळपट्टीची माती का खाल्ली याचा खुलासा केला आहे.

रोहित शर्माने बार्बाडोसच्या खेळपट्टीची माती खाण्यामागचे कारण सांगितले
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने बार्बाडोसच्या खेळपट्टीची माती खाण्यामागचे कारण सांगितले. बीसीसीआयने आपल्या वेबसाईटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा भारताचा चॅम्पियन बनल्यानंतर आपले मत मांडताना दिसत आहे.

रोहित म्हणतो बघा, “त्या गोष्टी खऱ्या आहेत, मला वाटत नाही की मी त्यांचे वर्णन करू शकेन कारण ते काही स्क्रिप्टेड नव्हते. हे सर्व सत्य होते, तुम्हाला माहिती आहे, जे काही अंतर्ज्ञानाने येत होते, मी खेळपट्टीवर गेल्याचे क्षण मला जाणवत होते, कारण त्या खेळपट्टीने आम्हाला हे शीर्षक दिले. आम्ही त्या विशिष्ट खेळपट्टीवर खेळलो आणि आम्ही खेळ जिंकला, ते मैदानही मला माझ्या आयुष्यात नेहमी लक्षात राहील आणि म्हणून मला त्याचा एक तुकडा माझ्यासोबत ठेवायचा होता, ते क्षण खूप, खूप खास आहेत आणि ते ठिकाण जिथे आमची सर्व स्वप्ने सत्यात उतरली आहेत. त्यामुळे त्यामागची भावना होती.”

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like