Dheeraj Ghate | आम्हाला कर्म शिकवण्याचा तुम्हाला अधिकार नाही; धीरज घाटेंचे काँग्रेसच्या अरविंद शिंदे यांना प्रत्युत्तर

Dheeraj Ghate | लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी हिंदूबद्दल केलेल्या विधानामुळे भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. पुणे शहरात भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करणारे फ्लेक्स उभारले आहेत. याच पोस्टरवरून घाटे यांना प्रत्युत्तर देताना काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावरुन आता धीरज घाटे यांनी अरविंद शिंदेंना प्रत्युत्तर दिले आहे.

“काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी आमच्या कर्माची चिंता करणे म्हणजे दारू पिणाऱ्याने व्यसनमुक्तीवर भाष्य करण्यासारख आहे. गेले ते 35 वर्षापासून संघाच्या संस्कारात काम करत इथपर्यंत आलो आहे. आम्हाला कर्म शिकवण्याचा तुम्हाला अधिकार नाही. राहुल गांधींच्या विरोधात लावलेले पोस्टर अरविंद शिंदे यांना झोमले आहेत. हिंदू धर्माचा अपमान झाल्यानंतर आम्ही शांत बसणार नाही शिंदेंचा तोल ढासळल्याने त्यांनी हे विधान केलं. माध्यमांसमोर बरळून चर्चेत येण्यासाठीच अरविंद शिंदे यांनी हे केलं,” असे धीरज घाटे (Dheeraj Ghate) म्हणालेत.

काय म्हणाले होते अरविंद शिंदे?
“भाजप अध्यक्ष स्वतः पोलीस संरक्षण घेऊन फिरतात. त्यांचा मर्डर करणार होते, तुझं वागणं नेमकं काय आहे हे त्यांना विचारा. तू एकटा फिरू शकत नाही. कधी तू मरशील हे माहित नाही. भाजपचे सर्व लोक बॉडीगार्ड घेऊन फिरतात, कारण यांचे कर्मच तशी केली आहेत” असे वादग्रस्त विधान अरविंद शिंदे यांनी केल आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष मनोहर भिडे गुरुजी यांनी स्त्रियांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिंदे माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, हिंदूंच्या नावावर हिंसा केली जाते, लोकांना भीती घातली जाते ते लोक हिंदू नाहीत. खरा हिंदू असे कधीच करत नाही हे राहुल गांधी म्हणाले. भारतीय जनता पक्षाकडे कोणताही मुद्दा नसल्याने शब्द फिरवून वेगळे नरेटीव्ह तयार केले जात आहे. तिनके को डुबने का सहारा असा प्रकार चालला असून हिंदू कधीही अत्याचार करत नाही, इतर समाजाचा आदर करतो हेच राहुल गांधी म्हणाले, असल्याचं देखील अरविंद शिंदे म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like