Big Breaking | पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर, काँग्रेसचे अजय राय यांनी घेतली आघाडी

Big Breaking | देशाचा पंतप्रधान कोण होणार हे ठरविणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. NDA विरुद्ध ईंडी आघाडी असा थेट सामना या निमित्ताने होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा देशाचे पंतप्रधान होणार का हे आजच्या निकालावरून स्पष्ट होणार आहे.

देशात या लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा (LokSabha Election Results 2024 LIVE Updates) सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच महाराष्ट्रातील निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. यंदा राज्यातील निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली असून अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर, काँग्रेसचे अजय राय यांनी घेतली आघाडी घेतली असून, नरेंद्र मोदी – 5257 तर, अजय राय यांना 11480 मते आहेत. या आकडेवारीनुसार नरेंद्र मोदी 6223 मतांनी पिछाडीवर (Big Breaking) असल्याचे चित्र आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप