अनुष्काच्या भावासोबत ब्रेकअप झाल्यानंतर तृप्ती डिमरी कोणाला डेट करतेय? ‘या’ श्रीमंत उद्योगपतीशी जोडलं जातंय नाव

Tripti Dimri Relationship: ‘अ‍ॅनिमल’ फेम तृप्ती डिमरी आज नॅशनल क्रश बनली आहे. रणबीर कपूरसोबतच्या (Ranbir Kapoor)  तिच्या केमिस्ट्रीची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत होती. दरम्यान, अभिनेत्रीच्या डेटिंगच्या बातम्या व्हायरल होत आहेत. ती एका श्रीमंत बिझनेसमनला डेट करत असल्याचं बोललं जात आहे.

तृप्ती दिमरी अनुष्का शर्माच्या भावाला डेट करत होती
तृप्ती डिमरी तिच्या अफेअरमुळे चित्रपट जगतात खूप चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिने अनुष्का शर्माचा भाऊ (Anushka Sharma Brother) कर्णेश शर्मालाही डेट केले आहे. तृप्ती जेव्हा कर्णेशच्या ‘बुलबुल’ सिनेमात दिसली तेव्हा तिचे नाव त्याच्यासोबत जोडले गेले. यानंतर तृप्तीने कर्णेशच्या काला चित्रपटातही काम केले.

कालानंतर तृप्ती डिमरी कर्णेशपासून विभक्त!
कर्णेश शर्मा आणि तृप्ती अनेकदा पार्ट्यांमध्ये एकत्र दिसत होते. एवढेच नाही तर दोघांच्या रोमँटिक फोटोंनीही लोकांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, तृप्ती किंवा कर्णेश या दोघांनीही त्यांच्या नात्याला दुजोरा दिला नाही. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या ब्रेकअपची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. मात्र, ब्रेकअपचे कारण समोर आले नाही. आता कर्णेशसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तृप्तीचे नाव कोणाकोणासोबत जोडले जात आहे.

कोण आहे तृप्ती डिमरीचा नवा बॉयफ्रेंड?
सध्या तृप्ती डिमरी हिचे नाव उद्योगपती सॅम मर्चंटसोबत जोडले जात आहे. अलीकडेच तृप्ती एका कार्यक्रमात सहभागी झाली होती, तिथून तिचा एक फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये ती सॅमसोबत पांढऱ्या रंगाच्या पोशाखात ट्विन्स करताना दिसली होती.

महत्वाच्या बातम्या-

‘हार्दिकने संघ सोडला, पण सूर्या-बुमराह संघाशी एकनिष्ठ राहिले’, MI बाबत डिव्हिलियर्सचे विधान

CID फेम अभिनेत्रीवर कुटुबियांकडूनच अत्याचार, शरीरावरील जखमा दाखवत मागितली मदत

हार्दिकच्या ‘या’ एका अटीमुळे रोहितची कर्णधारपदावरुन हकालपट्टी, विश्वचषकापूर्वीच ठरलं होतं सर्वकाही!