केंद्र सरकारचे नवी अभियान; घरोघरी राष्ट्रध्वज फडकणार

नवी दिल्ली –  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येत्या स्वातंत्र्यदिनी देशभरातील प्रत्येक घरांवर आठवडाभर राष्ट्रध्वज फडकवून जनतेत देशभक्तीची भावना जागृत करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. केंद्र सरकारच्या या झेंडा बंधनामुळे देशभरातील सुमारे 10 कोटी घरांवर फडकवण्यासाठी ध्वज तयार करणे, त्याच्या संहितेचे पालन करणे, वापरून झाल्यावर अवमान होणार नाही याची खबरदारी घेणे हे मोठे आव्हान असेल.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान देशातील 10 कोटी घरांवर सात दिवस राष्ट्रध्वज फडकवण्याचे ‘घरोघरी राष्ट्रध्वज'(हर घर झेंडम) अभियान राबविण्यात येणार असून राज्यात एक ते सव्वा कोटी घरांवर राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी राज्य सरकारनेही आतापासूनच तयारी सुरू केली आहे.